जिम मधील व्यायाम ही आधुनिक काळाची गरज : अतुल राऊत
Satara News Team
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
- बातमी शेयर करा

सातारा :आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही, आज जिमचा व्यायाम ही काळाची गरज बनली आहे,
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम” असे आपली वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळेतील पुस्तकात वाचले असेल आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते परंतु एवढे वाचून किंवा ऐकूनसुद्धा नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून जिमला जाणाऱ्या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे असे दिसते असे मत
अतुल राऊत, बॉडीबिल्डर अँड फिटनेस असोसिएशन जज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मन आणि मेंदू ला आपण काबू करू शकत नसल्यामुळे आजची युवा पिढी गुलाम होताना दिसत आहे, अशीच वाटचाल चालू राहिल्यास इतर देशांच्या तुलनेत आपण पाठीमागे राहूच परंतु अनेक प्रकारच्या व्याधी ने आपण त्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही मोबाईल असो किंवा इंटरनेट असो योग्य कामासाठीच उपयोग करणे आवश्यक आहे, त्याच्या आहारी गेल्यास विनाश निश्चित आहे
गेले १७ वर्ष मी या फिटनेस क्षेत्राशी निगडित असून कित्येक जणांना सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी तयार केले आहे. आज पुण्यासारख्या प्रगतशील व फिटनेस क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांना माझ्याकडून मार्गदर्शन करण्याचा योग आला तेच मी माझे परम भाग्य समजतो. काही वर्षांपूर्वी देशावर आलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये या फिटनेस क्षेत्रानेच लोकांना आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले व कित्येकांचे प्राण देखील वाचवले.
आज प्रसारमाध्यमांशी अतुल राऊत, बॉडीबिल्डर अँड फिटनेस असोसिएशन जज हे बोलत होते यावेळी या क्षेत्रातील अभ्यासक अक्षय लोखंडे, फिटनेस कौन्सिलर तसेच या क्षेत्राशी निगडित असणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Fri 31st Mar 2023 04:40 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Fri 31st Mar 2023 04:40 pm