सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ.

सातारा : सातारा जिल्ह्यात चिंचणेर वंदन येथे पुन्हा चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.. सुमारे पंधरा दिवसानंतर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे आरोग्य यंत्रणेची धास्ती वाढली आहे.. एकीकडे एन्फ्लुएंझाच्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली असताना कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. सध्या यात्रांचा हंगाम असल्याने परजिल्ह्यातून भाविक साताऱ्यात येत आहेत.. गर्दीच्या ठिकाणी न जाता नागरिकांनी मास्कचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे सर्वत्र सर्दी, खोकला, ताप, थंडी यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला