सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल लागताच साताऱ्यात शिंदे गटाचा फटाके फोडून ,पेढे वाटून जल्लोष

साताऱ्यात शिंदे गटाचा फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष पेढे वाटून केला आनंद व्यक्त, साताऱयाच्या बाळसाहेबांची हजेरी

सातारा  : सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल दुपारी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने गुरुवारी दुपारी साताऱयात पंताचा गोट येथील शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत जल्लोष केला. यावेळी शिंदे गटाचे सातारा शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.  
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे लागून राहिले होते. सकाळपासूनच दुरदर्शनवर काऊंट डाऊन सुरु असल्याचे दाखवण्यात येत होते. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास निकाल वाचनास प्रारंभ झाला. शिवसेनेचे साताऱयातील शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते निकाल पहात होते. निकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने लागल्याचे समजताच शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे कार्यकर्ते अभिजित सपकाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून शिवसेनेचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, यावेळी बोलताना शहर प्रमुख निलेश मोरे म्हणाले, हा सत्याचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांसाठी हिंदूत्वासाठी सरकार स्थापन केले आहे. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश चंद्रचुड यांनी जो निर्णय दिला आहे. त्यांच्या निर्णयाबाबत त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करताना कार्यकर्ते.  

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला