पवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळा..आठवड्याला शरद पवार यांची वक्तव्य बदलत राहतात - राजू शेट्टी यांची शरद पवारांवर टीका..
Satara News Team
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात पावसात भिजत शरद पवार राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी करायचे आहे असे म्हणाले होते.. ज्या पद्धतीने पहिल्या पावसात शेतातील ढेकळं जशी विरघळतात त्या पद्धतीने पवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळा मात्र त्यानंतर पुढे काय घडलं हे आपल्याला माहिती आहे.. आठवड्याला शरद पवार यांची वक्तव्य बदलत राहिल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला किती प्रतिक्रिया द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे असे सांगत खासदार शरद पवारांनी महाविकास आघाडी वर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..
सध्या राज्यभर महाविकास आघाडीच्याi सभा सुरु असून विरोधकांनी आपली बाजू मांडली पाहिजे. पण, या सभांतून एकमेकांचे वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सभांतील भाषणांत मते मांडली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली असती. पण, ही मंडळी ईडीने ED भेदरलेली असल्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलिकडे काहीही दिसत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
माजी खासदार राजू शेट्टी आज सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या सभा सुरु आहेत, याविषयी विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, सभांच्या माध्यमातून विरोधकांनी बाजू मांडली पाहिजे.
या सभांतून एकमेकांची वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांचे नुकसान, बियाणे, औषधे व खतांचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, तसेच शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर चर्चा व भाषणे झाली असती, तर शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली असती. मुळात ही मंडळी ईडीने भेदरलेली आहेत. त्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करायचे या पलिकडे महाराष्ट्रात काहीही चालले नाही.
सध्या दिल्लीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत, याविषयी बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, यावर बोलण्यात मला अजिबात रस नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी व व्यापारी, हमाल दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे.
हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत सुरु असलेल्या उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढल्या जातील, असे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक देण्यासाठी हे पॅनेल उभे केले आहे. ही निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रास दिला गेला. पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही धमकीला भीक घातली नाही, असे त्यांनी सांगितले
#RajuShetty
#MahavikasAghadi
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Mon 24th Apr 2023 12:58 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Mon 24th Apr 2023 12:58 pm











