प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका

वाई : पसरणी (ता. वाई) येथील तरुणाला कोल्हापूरमधील काही युवकांनी मंगळवारी रात्री बेदम मारहाण करून अपहरण केले होते. वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करून पाच संशयितांना अटक केली.

 संशयितांना वाई न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सनी रमेश भोसले (रा. उत्तेश्वर मंदिर कोल्हापूर मूळचा राहणार पसरणी ता. वाई) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश विश्वास काटकर, प्रशांत प्रकाश सुर्वे, शुभम सुनील जाधव, मानसिंग विजयसिंह भोसले, अभिजित उर्फ पंप्या सर्जेराव तवंदकर (सर्व रा. उत्तेश्वर मंदिर महादेव कोल्हापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

 याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सनी भोसले हा लहानपणापासूनच कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भागातील उत्तरेश्वर मंदिरा शेजारी राहत आहे. त्याचे शेजारी राहणार्‍या विवाहित महिलेसोबत प्रेम प्रकरण चालू होते, त्यातूनच त्याने त्या महिलेला फूस लावून पसरणी येथे पळवून आणले होते. तिच्या पतीसह सात लोकांनी पसरणीत येवून त्याला बेदम मारहाण करत बरोबर आणलेल्या चार चाकी गाडीतून त्याचे अपहरण करून कोल्हापूरला नेले. अपहरण झाल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पोनि जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी त्वरित वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला शोधार्थ पाठवले. या पथकाने कोल्हापूर पोलिसांची मदत घेत अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करुन संशयितांना अटक केली. 

 संशयितांना वाई न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच वाईतील खाजगी रुग्णालयात रमेश भोसले याच्यावर उपचार चालू आहेत. अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला