शैलजा खरात यांची संघटक सचिव पदी नियुक्ती महिलांसाठी काम करत राहणार-शैलजा खरात

लोणंद : 
राजकारणासोबत सामाजिक कार्यात मोठे योगदान देणाऱ्या खंडाळा तालुक्यातील लोणंद नगरीच्या माजी नगरसेविका शैलजा बाबासाहेब खरात यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून  "महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी" नेमणूक करण्यात आलेली असून या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.पुणे येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे,आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,महिला अध्यक्षा रोहिणी खडसे,कविता म्हेत्रे,
वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा अध्यक्ष 
डॉ.नितीन सावंत,जिल्हाध्यक्ष आशा भिसे ,संजना जगदाळे आदींसह सर्व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीनीचा कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.या कार्यक्रमातून निवडी जाहीर करण्यात आल्या.नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी लोणंद ता.खंडाळा येथील शैलजा खरात यांची प्रदेशस्तरावर पक्षाच्या संघटक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.या निवडीबद्दल लोणंद सह सातारा जिल्ह्यातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येऊ लागले आहे.माजी खासदार श्रीनिवास पाटील,आ.शशिकांत शिंदे,डॉ.नितीन सावंत,दयाभाऊ खरात,हेमंत आप्पा पवार,दीपक जाधव,उमेश धायगुडे,
पानसरे,राजाभाऊ खरात, शशिकांत खरात,आतिश खरात,दत्तात्रय खरात,संतोष खरात,अ‍ॅड.अमित खरात,योगेश खरात,अ‍ॅड.विलायत मणेर,संजना जगदाळे,मोहिनी मिसाळ,मालन चव्हाण आदी सह इतरांनी त्यांचे अभिनंदन केले.या निवडी बद्दल शैलजा खरात यांनी विशेष समाधान व्यक्त केले.शैलजा खरात म्हणाल्या की,आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाली आहे.यापुढे आपण महिलांसाठी असेच काम करत राहणार आहे.महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणार आहे.या पदाचा योग्य ठिकाणी योग्य वेळी वापर करणार आहे.विशेष करून पक्ष वाढी साठी व महिलांचे संघटन वाढीसाठी या पदाच्या माध्यमातून विशेष मेहनत घेणार आहे.असे सुध्दा त्यांनी सांगितले.शैलजा खरात यांनी राजकारणासोबतच सामाजिक कार्याची सुद्धा बांधिलकी जपलेली आहे.गेली अनेक वर्षापासून त्या राजकारणाबरोबर समाजकारणात सुद्धा सक्रिय आहेत.यापूर्वी त्यांनी अनेक पदे भूषविलेली आहेत.काँग्रेस मध्ये असताना त्यांनी खंडाळा 
तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी पेललेली आहे.आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षात असून त्या पक्षवाढी सोबतच महिला संघटन करण्यावर विशेष भर देत आहेत.नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबविली होती.वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघातून त्यांनी सुद्धा ठीक ठिकाणी प्रचार केला.आगामी विधानसभेच्या निवडणूकीत सुद्धा मोठ्या ताकतीने आमचा पक्ष लढणार असल्याचे शैलजा खरात यांनी सांगितले.खरात कुटुंबातील महिला प्रदेश स्तरावरील पदावर विराजमान झाल्या बद्दल सर्व खरात समाजाला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटत असल्याच्या भावना सुद्धा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.आजपर्यंत मिळालेली अनेक पदे यशस्वीपणे पदे गाजवली असून तळागाळातील 
लोकांपर्यंत आपले संघटन कौशल्य वाढवत लोणंद पंचक्रोशीमध्ये एक चांगला ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त केला असा भाव व्यक्त करत समस्त खरात हितकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शैलजा खरात यांचा सत्कार केला.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला