सातारा सेतूमधील अपहाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल

सातारा प्रांताधिकाऱ्याना दिले चौकशीचे आदेश

सातारा, : सातारा तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जुलै २२ ते जून २३ या वर्षाच्या कालावधीमध्ये करारानुसार ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन प्रतिज्ञापत्र नोंद करून १४ लाख ७१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत सातारा न्यूजने पहिल्यादा बातमी प्रसारीत केली होती याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत माहिती अशी की,दोनच दिवसापूर्वी सातारा न्यूजने { सातारा सेतूमध्ये १४ लाख ७१ हजारांचा अपहार ? } या शिर्षका खाली बातमी प्रसिद्ध केली होती  शासनाने विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे, दाखले,प्रमाणपत्र, उतारे  अशी कागदपत्रे नागरिकांना एकाच छताखाली मिळावीत यासाठी नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतूच्या माध्यमातून एक खिडकी योजना अंमलात आणली. त्यासाठी कराराने ठेकेदार नेमण्यात येऊन त्यांचेकडे सुविधा देण्याचे काम सोपविले.परंतु सातारा तहसील कार्यालयातील सेतू विभागाच्या ठेकेदाराने तज्ञ मनुष्यबळ, सक्षम यंत्रणा नसतानाही काम घेऊन येथील सुविधा पुरविताना हलगर्जीपण केला एवढेच नव्हे तर हे काम करत असताना शासनाची फसवणूक केले असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त माहितीतून सिद्ध झाले.

जुलै २०२२ ते जून २०२३ अखेर ५१ हजार ७९० इतकी प्रतिज्ञापत्र सातारा सेतु कार्यालयातून दिले गेले आहेत त्यापैकी केवळ ८,५२३ इतक्या प्रतिज्ञापत्राचे ऑनलाईन रेकॉर्ड उपलब्ध झाले आहे तर ४३,२६७ इतक्या प्रतिज्ञापत्राची ऑनलाईन नोंदणीच केली नाही त्यामुळे प्रतिज्ञापत्रासाठी आकारले जाणारे ३४ रुपयाचे शुल्क लक्षात घेता संबंधित ठेकेदारांनी १४ लाख ७१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी दाखल करून ठेकेदारासह सेतूवर नियंत्रणाचे काम सोपविलेल्या तहसिलदार व इतर अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान,आज सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सातारा प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला