पाचवड,मेढा,पाचगणी रस्ता;अपघाताच्या प्रमाणात वाढ

दारू पिऊन व निष्काळजी पणाने वाहन चालवीत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ

पुणे - सातारा महामार्गावरील पाचवड ते कुडाळ,पाचगणी,मेढा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून यात दारू पिऊन वाहन चालवणे,वाहन चालवताना निष्काळजीपणा,मोबाईलवर बोलणे,वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष या सह बर्याच ठिकाणी वळणदार रस्ता घातक ठरत आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून रस्ता गुळगुळीत व रुंदीकरण झाला असला तरी वाढत्या अपघाताची मालिका चिंता वाढविणारी दिसत आहे.

या मार्गावर मार्गदर्शक फलक व वळणावर दिशानिर्देशक बरेच ठिकाणी दिले नसल्याने हेही कारण अपघातास कारणीभूत ठरत आहे. पाचवड पाचगणी ते पाचवड मेढा या मार्गावरील डोंगरी भाग असल्यामुळे अनेक ठिकाणी वळणे आहेत.या वळणावर भरधाव जात असताना वाहन चालकांना कुठलाही अंदाज येत नाही.त्यात दारू पिऊन वाहन चालवणे,वाहन चालवताना निष्काळजीपणा,वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष,वाहनाची वेळेवर देखभाल न करणे लहान मुलांना दुचाकी वाहन चालवण्यात देणे या सह अनेक अपघातामध्ये कारणाचा समावेश करता येईल.याच मार्गावर अमृतवाडी, सरताळे,म्हसवे वळणावर  धोकादायक आणि अपघातग्रस्त ठिकाणे आहेत.येथे अनेक अपघात झाले आहेत.त्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होण्याचे प्रकार खूप आहे. रस्त्याची रुंदी वाढविण्यात येऊन रस्ता गुळगुळीत असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ व वेग वाढला आहे.पाचगणी,महाबळेश्वर या पर्यटणस्थळावर जाण्यासाठी या मार्गा वरुण वर्दळ वाढल्यामुळे वाहनांची या मार्गावर संख्या वाढली आहे.महामार्गालगत सहज मिळणारी दारू होणाऱ्या अपघाताला विशेष कारणीभूत ठरत आहे.रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग वाढलेला आहे. याठिकाणी दिशादर्शक आणि मार्गदर्शन सूचना फलकांचा अभाव आहे.संबंधित विभागाने रस्त्यावर फलक लावण्याची गरज असून या सोबतच ड्रिंक अँड ड्राइव्हवर कठोर निर्बंध आणून यासह वाहतूक नियमाविषयी वाहन चालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज
असल्याचीही वाहन चालकांकडून मागणी होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला