थकीत एफ. आर. पी. द्या अन्यथा धुराडे पेटू देणार नाही : रयत क्रांती संघटनेचा कारखानदारांना इशारा

Overdue f. R. P. Give otherwise Dhurade will not be allowed to burn: Rait Kranti Sangathan's warning to the factories

सातारा : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी मागील हंगामातील उसाची एफ. आर. पी. शेतकऱ्यांना दिलेली नाही. ती तात्काळ अदा करावी अन्यथा यंदाच्या हंगामाचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी मागील हंगामातील रक्कम बाकी ठेवली आहे. अशात आता दसरा, दिवाळी तोंडावर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना मुलांच्या शिक्षण व रुग्णालयाचे खर्च आहेत.असे असताना कारखानदार शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे एक वर्ष उलटून ही देण्यास तयार नाहीत. अशी भूमिका कारखानदार घेणार असतील तर रयत क्रांतीला कारखानदारांचे नाक कसे दबायचे हे चांगले माहिती आहे. ही वेळ त्यांनी ओढून घेवू नये व तात्काळ दसऱ्याच्या आत शेतकऱ्यांची देणी अदा करावीत अन्यथा धुराडे तर पेटू देणारच नाही अन् ऊस वाहतूक देखील कशी ठप्प करता येते, हे देखील कारखानदारांनी आता पहावे लागेल, असा इशारा प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला