साताऱ्यात नवविवाहित तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या

सातारा:  दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरूणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे घडली आहे. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय २२), असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले होते.
पत्नी गेली होती माहेरी - पाटणच्या ढेबेवाडी खोऱ्यातील करपेवाडी गावचा रहिवासी असलेला स्वप्नील करपे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचे वडील व मोठा भाऊ कामानिमित्ताने मुंबईला असतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी मुंबईला गेली गेली असताना स्वप्नीलने आत्महत्या केली. या घटनेमुळे ढेबेवाडी खोऱ्यात खळबळ उडाली आहे.
श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या - रात्री घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो फोटो ठेवला. लवकरच ह्या फोटोला हार चढणार आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. माणसांसाठी आता बस्स,नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय ह्या फोटोला हार चढला तर मला... भावपूर्ण श्रद्धांजली! असा मजकूर लिहिला.
स्टेट्स पाहून मित्रांची धाव - स्टेट्स पाहून मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांनी खिडकीतून पाहिले असता स्वप्नीलने गळफास घेतल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. स्वप्नीलच्या आत्महत्येचा कुटुंबीय आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला