विहिरीत पडून रानगव्याचा मृत्यू कास पठार जवळील पिसानी गावातील घटना
Satara News Team
- Sat 26th Nov 2022 06:24 am
- बातमी शेयर करा
कास पठार : कास पठार लगत असणाऱ्या सातारा तालुक्यातील पिसानी गावातील श्री नामदेव दगडू गोगावले यांच्या गिरनोळी नावाच्या शिवारात असलेल्या विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या रानगव्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे साधारण दोन-तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असावी अशी शक्यता आहे
कास पठार पासून सातारच्या दिशेला जवळजवळ पाच किलोमीटर अंतरावर ती पिसाणी हे गाव असून या परिसरात रानटी प्राण्यांचा जास्त उपद्रव असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी जवळ जवळ शेती करणे सोडून दिले आहे त्यामुळे शेत शिवारात भटकंती करणे थांबले आहे पिसाणी गावचे श्री नामदेव दगडू गोगावले दर चार-पाच दिवसांनी आपल्या शिवारात असलेल्या विहिरीच्या परिसरात जाऊन एक फेरफटका मारत असतात आज सकाळी फेरफटका मारत असताना त्यांना विहिरीत रानगवा पडलेला दिसून आला आणि मृत अवस्थेत आसल्याचे दिसून आल्यानंतर पिसानी गावचे सरपंच श्री लक्ष्मण गोगावले यांनी वन विभाग सातारा यांना सूचना दिली असून सातारा वन विभाग त्याचप्रमाणे कास पठार कार्यकारी समितीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 26th Nov 2022 06:24 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 26th Nov 2022 06:24 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 26th Nov 2022 06:24 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 26th Nov 2022 06:24 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 26th Nov 2022 06:24 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 26th Nov 2022 06:24 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 26th Nov 2022 06:24 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 26th Nov 2022 06:24 am













