जावलीतील करंदोशी गावात ढगफुटी पिण्याच्या पाण्याची विहीर आणि शेती गेली वाहून

कुडाळ (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील करंदोशी गावात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने गावातील पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे या गावात पिण्याच्या पाण्याची विहीर यासह शेती देखील वाहून गेली आहे 
गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे
 रात्रभर पडत असणाऱ्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या या गावात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट गावात घुसल्याने घराघरात पाणी चिखलाचे व गाळाचे मातीचे लगदे घरात दिसून आले
 डोंगर उतारावरून दगड देखील गावात वाहून आले होते या गावात पूर्णतः भात शेती पाण्यात वाहून गेल्याने या गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने तात्काळ या गावाचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे अद्यापही कोणताही प्रशासनाचा अधिकारी गावात पंचनामासाठी पोहोचला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
 गाव रात्रभर भीतीच्या छत्र छायेखाली असल्याने डोंगर पायथ्याला असणाऱ्या या गावावर पावसाचा धसका गावकऱ्यांनी घेतला आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला