आ. जयकुमार गोरे यांना मंत्रीमंडळात घ्या
सरपंच उमेश आटपाडकर यांची मागणी
Satara News Team एकनाथ वाघमोडे- Thu 7th Jul 2022 01:38 pm
- बातमी शेयर करा
माण - खटावच्या सर्वांगीण विकास करण्याची धमक केवळ आमदार जयकुमार गोरे यांच्याकडेच असून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करून माणचा सन्मान वाढवावा अशी मागणी आमदार गोरे यांचे कट्टर समर्थक व कुरणेवाडीचे सरपंच उमेश भागवत आटपाडकर व कार्यकर्त्यांच्या वतीने केली आहे.
माण-खटावच्या सूज्ञ जनतेचा विश्वास आमदार गोरे यांच्या नेतृत्वावर ठाम आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी म्हसवड येथील जाहीर सभेत माण खटाव तालुक्यातील जनतेला शब्द दिला आहे. माण - खटाव तालुक्यातील मतदारांनी आ .जयकुमार गोरे यांना पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी करा . मी आमदार गोरे यांना मंत्रीमंडळात मंत्री करतो. माण - खटावच्या जनतेने तिसऱ्यांदा जयकुमार गोरे यांना आमदार केले आहे असे ही सरपंच उमेश आटपाडकर म्हणाले आहेत.
माण - खटावचे आमदार जयकुमार गोरेंना लवकरच लाल दिवा मिळणार अशा चर्चा झाडू लागल्या आहेत. भाजप व मित्रपक्षांची सत्ता आली . आमदार गोरे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश असेल, असा विश्वास कार्यकर्त्यांसह जनसामान्यांतून व्यक्त होतोय. त्यामुळे गोरेंच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरेंनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. २००९ मध्ये अपक्ष, २०१४ मध्ये काँग्रेस तर २०१९ च्या निवडणुकीत भाजप मधून विजयी होऊन गोरेंनी यशाची हॅट्ट्रिक साधली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करून राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात भाजप व मित्रपक्षांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. माण - खटावचे आमदार गोरे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे.

आमदारकीच्या काळात माणच्या पाणीप्रश्नासह एमआयडीसी व इतर समस्यांबाबत आमदार गोरेंनी विधानसभेत आवाज उठविला आहे. माण खटाव मतदार संघातील समस्या सोडविताना आक्रमक भूमिका घेत असल्याने आमदार गोरेंनी राज्यात आपला पगडा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा राज्यातील राजकीय शत्रू मनाला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी गोरेंना मंत्रिपद दिले तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढीसाठी मदत होईल.
भाजप कार्यकर्त्यांबरोबर माण - खटाव या दोन्ही तालुक्यातील भाजपप्रेमी जनता आमदार गोरेंच्या पाठीशी ठाम आहे. माण-खटावच्या जनतेची शेती पाण्याची तहान भागविण्याची धमक आमदार गोरे यांच्याकडे असून राज्यमंत्री मंडळात समावेश करून दुष्काळी भागाचे लाल दिव्याची स्वप्नपूर्ती करावी अशी मागणी सरपंच उमेश आटपाडकर यांनी केली आहे.
jaykumargore
sarpanch
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Thu 7th Jul 2022 01:38 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Thu 7th Jul 2022 01:38 pm











