इन्स्टाग्राम वरून केलेली मैत्रिणीची मस्करी आणि पुढे अस घडलं.

कोरेगाव : युवकाचा नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलने सुरु केले. पुढे बोलत बोलत मैत्रीण (तिच्या) युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी संबंधित बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघदलेल्या युवतीशी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती व दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या. या युवतीने मस्करीपोटी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडले व आपल्या मैत्रिणीला फ्रेंड – रिक्वेस्ट पाठवली. मैत्रिणीने ती स्वीकारली व बनावट अकाउंटवरून एकमेकांशी संवाद सुरू झाला. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ती मैत्रीण मनीषला भेटण्यासाठी आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचाईत झाली.

भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले. त्या माध्यमातून व मनीष याच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इन्स्टाग्रामवरूनच सांगितले. तसे दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले. त्यामुळे या विरहातून चोवीस वर्षीय मुलीने १२ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद वाठारस्टेशन पोलिस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती

सातारा सायबर पोलिस व सायबर तज्ज्ञ जय इन्स्टाग्रामकडून गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती मागवली. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चेष्टा-मस्करीमुळे एका मुलीचा नाहक बळी गेला. हा सर्व प्रकार करणाऱ्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलिस कर्मचारी चव्हाण, देशमुख, इथापे यांच्यासह सातारा सायबर टीमने ही घटना उघडकीस आणली

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला