सातारा जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उदयनराजे व रामराजे यांच्यातील हास्यविनोदाने अनेकांचे चेहरे पडले
Satara News Team
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपला जुना वाद विसरत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खा. उदयनराजे भोसले एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोदात रमले होते. त्यामुळे काहींचे चेहरे पडले होते तर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, फलटण आणि सातारच्या राजांमध्ये दिलजमाई कधी झाली, असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता
सातारा जिल्ह्यात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची दहिवडीत सभा होत. कोल्हापूरकडे जाताना श्री. पवार यांनी माण तालुक्यातील दुष्काळी जनतेची विचारपूस करण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीतील बीजेपी घटक पक्षांतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदेंनी रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना डिवचले.परिवर्तनाची सुरवात फलटणमधून होणार असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही निंबाळकरांना आव्हान दिले. याची चर्चा सुरु असतानाच आज दुपारी सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोदात रमले होते. त्यामुळे अनेकंच्या भुवया उंचावल्या गेल्या.
या दोघांतील वाद आणि त्यातून त्यांनी एकमेकांना शासकिय विश्रामगृहात दिलेले आव्हान संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. पण, आता हा वाद मिटला असून या दोघांत दिलजमाई झाली हेच यातून सर्वांना जाणवले. यातून आगामी राजकारणात जिल्ह्यात कोणते फुल उमलणार याची उत्सुकता सातारकरांना आहे.
#SharadPawar
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Fri 25th Aug 2023 07:18 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Fri 25th Aug 2023 07:18 pm











