सणाच्या स्पर्धा मधून महिलांना विविध कला गुणदर्शन सादर करण्यासाठी नवीन व्यासपीठाचे दालन : डॉ. अरुणाताई बर्गे

पुसेगाव -एकंबे तालुका कोरेगाव येथे चव्हाण दापत्यांच्या वतीने सौ प्रतिभा चव्हाण व ॲडव्होकेट  राजेश चव्हाण यांनी पारंपारिक पद्धतीने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली ही अतिशय अप्रतिम व स्तुत्य  अशी असून या सणाच्या माध्यमातून महिलांना विविध कला गुण दर्शनाचा वाव मिळत असून महिलांसाठी अशा स्पर्धा आपल्या विविध कला कौशल्य सादर करण्याचे एक व्यासपीठ या रूपाने मिळाले असल्याचे मत आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणाताई  बर्गे यांनी व्यक्त केले.
.  एकंबे येथे भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा समयी येथील भैरवनाथ मंदिर मध्ये आयोजित बक्षीस समारंभा वेळी बोलत होत्या,
बर्गे पुढे म्हणाल्या "अशा स्पर्धा मध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे, ही बाब खरोखर अभिनंदनिय आहे.आज महिला परंपरा, रूढी प्रथेनुसार नटून थटून सणा बरोबर स्पर्धेमध्ये 83 महिलांनी भाग घेतला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग खरोखरच प्रशंशापूर्वक व उल्लेखनीय आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या पाच क्रमांकाला बक्षीस देण्यात येणार असून दहा जणांना उत्तेजनार्थ बक्षीस हे देण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. अरुणाताई  बर्गे यांचा शाल श्रीफळ देऊन व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार, कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. प्रतिभा चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला. या गौरी गणपती सजावट स्पर्धाचे आयोजन  कोरेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा एकंबेचे उपसरपंच ॲडव्होकेट  राजेश चव्हाण  यांचे वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकंबे गावच्या सरपंच शोभा करणे  मा. उपसरपंचअशोक चव्हाण, दिनकर बाबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, चंद्रकांत चव्हाण (बापू ) तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चव्हाण,सर्व स्पर्धक महिला, ग्रामस्थउपस्थित होते. या स्पर्धेसाठी महिला परीक्षक पंच  म्हणून साधना बर्गे, आरती माने, लता सारडा, व पल्लवी शिंदे यांनी काम पाहिले,  कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट राजेश चव्हाण यांनी केली. तर सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले. या स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक साधना राजकुमार चव्हाण, नीलम ज्ञानदेव चव्हाण, मेघा शंकर चव्हाण, रोशनी सुयश चव्हाण, अंजना संतोष इधाते उत्तेजनार्थ क्रमांक - पोर्णिमा चव्हाण, सीमा चव्हाण, शोभा करणे,राजश्री ननावरे, कल्याणी चव्हाण,स्वाती दीक्षित, पुनम शिंदे, प्राजक्ता चव्हाण, साधना शेळके, पल्लवी सूर्यवंशी, अनिता वेल्हाळ, व सहभागी स्पर्धकांना पाटील ज्वेलर्स व श्रीमती निर्मल पंढरीनाथ चव्हाण  कोरेगाव यांचेकडून  आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला