कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
Satara News Team
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
- बातमी शेयर करा

कोरेगाव : पत्नीला लॉजमध्ये नेवून सरपंच पतीने तोंडावर उशी ठेवून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सरपंच संतोष चव्हाण यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सासूनेही दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पती संतोष गुलाब चव्हाण, सासू कलावती गुलाब चव्हाण (दोघे रा. कुमठे ता. कोरेगाव) यांच्याविरुध्द मयुरी रमेश कांबळे (वय 30, रा. कुमठे ता.कोरेगाव सध्या रा.रविवार पेठ, वाई) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान संतोष चव्हाण हे कुमठे गावचे सरपंच आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुनाच्या प्रयत्नाची घटना एप्रिल 2025 मध्ये सातार्यातील एका लॉजमध्ये घडली आहे.
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात असलेल्या लॉजमध्ये तक्रारदार पत्नी व पती थांबले होते. त्यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. या वादावादीनंतर पतीने पत्नी झोपली असताना तोंडावर उशी दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संतोष चव्हाण हे कुमठेचे लोकनियुक्त सरपंच आहेत. सरपंच पदावर असताना चव्हाण यांनी स्त्री सन्मानाचा अपमान करत गंभीर गुन्हा केला आहे. यामुळे पीडित महिला असलेल्या त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे संतोष चव्हाण यांना सरपंचपदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 2nd Jul 2025 10:45 am
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 2nd Jul 2025 10:45 am