आ.जयकुमार गोरेंनी केले खा.उदयनराजेंचे अभिनंदन

दहिवडी  :  राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेला व 2024 च्या लोकसभेला सर्वात जास्त घडामोडी घडलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रणांगणात होते. 

 या अटीतटीच्या सामन्यात अखेर महायुतीचे उमेदवार खा.उदयनराजे भोसले यांनी विजयश्री खेचून आणत विरोधकांना आस्मान दाखवले. सुरुवातीच्या काळापासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष दस्तरखुद्द शरद पवारांसह राष्ट्रावादीतील प्रमुख नेतेमंडळींनी सातारा लोकसभेत पाय रोवले होते. त्यांनी सर्वात जास्त लक्ष सातारा लोकसभेवर दिल्याचे सातारकरांचा पाहिले आहे. 

उदयनराजे भोसले खासदार झाल्यानंतर त्यांचे जिवलग मित्र माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माण खटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, निलेश माने यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त खासदार यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला