गजवडी येथील कदम कुटुंबियांची अनोखी संक्रात खिदमत ए खलक संग गोड

सातारा : सातारा तालुक्यातील परळी भागातील गजवडी गावात माणुसकीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खिदमत ए खलकह्या संस्थेने कदम कुटुंबातील 10 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रज्वल प्रेमनाथ कदम याच्या 10 वी च्या परीक्षेपर्यंत शिक्षणाच्या सर्व खर्चाची व रेशन ची जबाबदारी स्विकारत तीळ वडी भेट देत अनोखी संक्रात साजरी केली.
सातारा जिल्ह्यातील परळी भागातील कदम कुटुंबातील प्रेमनाथ कदम हे कुटुंब प्रमुख आहेत त्यांचा रत्नागिरी येथे रेल्वेशी अपघात झाला .अपघातामध्ये प्रेमनाथ कदम यांचे दोन्ही पाय तुटले व प्रेमनाथ कदम ह्यांना अपंगत्व आले. शारीरिक कमजोर झाल्याने कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी प्रेमनाथ कदम यांनी जिल्हा परिषद शाळेबाहेर भाजीपाल्याची टपरी सुरू केली व त्या टपरीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला .गेले 8 वर्षे झाले प्रेमनाथ कदम कुटुंबिय अतिशय कष्टाचे व हलाकीचे जीवन जगत आहेत .कदम कुटुंबियांच्या ह्या खडतर प्रवासाला सुखर करण्यासाठी त्यांचा 10 वी इयत्तेत शिकणारा प्रज्वल व 8 वी इयत्तेत शिकणारा साईराज हातभार लावत आहेत . 10 वि इयत्तेत ए शिकणारा मुलगा प्रज्वल हा सातारा शहरातून भाजीपाला घेऊन जाऊन विक्री करत असतो ही बाब समाज सेवा करणाऱ्यात अग्रेसर असणाऱ्या  खिदमत ए खलक संस्थेला समजली . माणुसकीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खिदमत ए खलक ने निर्णय घेतला की ह्या कुटुंबाची संक्रात ही 10 वीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारुन साजरी केली आहे.
विक्री साठो भाजी घेऊन जाणाऱ्या प्रज्वल कदम याला अपघातात जणू देवदूतच भेटले.छोट्याशा अपघातावेळी खिदमत ए खलक चे सादिकभाई शेख व हाजी इस्माईल शेख हे भेटले व विचारपूस करत त्यांना सर्व हकीकत समजली व त्यांनी खिदमत ए खलक च्या बैठकीत विषय मांडला व सर्वानुमते निर्णय झाला की कदम कुटुंबियांची दिवाळी  शिक्षणाचे पालकत्व स्विकारुन पूर्ण करायची.
आज 15 जानेवारी 2023 खिदमत ए खलकच्या सदस्यांनी कदम कुटुंबियांची भेट घेत रेशन व प्रज्वल साठी जानेवारी महिन्याचा शैक्षणिक खर्च व तिळाची वडी आणि वह्या भेट दिल्या . 8 वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी मायेची विचारपूस करत कदम कुटुंबियांना धीर दिल्याने कदम कुटुंबीय भारावून गेले होते व त्यांना अश्रू अनावर झाले . 
ह्यावेळेस खिदमत ए खलकचे सादिकभाई शेख ,मुबिन महाडवाले ,असिफ खान ,हाजी इस्माईल शेख ,आरिफ खान ,सलीम शेख ,मुज्जफर शेख ,समीर मुलाणी , सज्जाद भाई व इतर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला