सातारा येथे नग्न अवस्थेत युवकाचा धिंगाणा

सातारा : आज सकाळी सातारा येथे एका युवकाने नग्न अवस्थेत धिंगाणा घातल्यामुळे काही वेळ सातारा- रहिमतपुर मार्गावर चांगलीच खळबळ उडाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा - रहिमतपुर मार्गावर कामाठीपुरा परिसरात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे. त्यास परिसरात पुस्तके, स्टेशनरी, झेरॉक्स, लॅमिनेशन अशी शिक्षणाला पूरक अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आज सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोरील मार्गावर एक युवक नग्न अवस्थेत रस्त्याने चालत जात असताना दिसला. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येतात त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्या युवकाला पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने तब्बल २ तास रस्त्यावर धिंगाणा घातला. अखेर त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. या युवकाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तो अत्यंत तणावाखाली असल्यामुळे त्याचे नाव, गाव काहीही समजू शकले नाही. मात्र ऐन सणाच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाविद्यालया परिसरात काही वेळ चांगलीच खळबळ उडाली होती.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला