नेले किडगाव येथे आजपासून वार्षीक यात्रेचे आयोजन

किडगांव : सातारा तालुक्यातील  नेले किडगाव या दोन्ही गावच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेची गुरुवारपासून सुरुवात होत असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
  गुरुवार दिनांक 24 रोजी यात्रेचा मुख्य दिवस अजून रात्री १० वाजता देवाची महाआरती झाल्यानंतर भव्य असा छबीना काढण्यात येणार आहे.नेले येथे यात्रेनिमित्त 24 रोजी मंगला बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले असून 25 रोजी रात्री आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. किडगाव यात्रेनिमित्त भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 मे रोजी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत आयोजित करण्यात आला असून रात्री महाराष्ट्रातील दुसरा नामांकित तमाशा मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा रात्री दहा ते दोन यावेळी होणार आहे. शनिवार दिनांक 25 मे रोजी शिवबा ग्रुप यांच्या वतीने राधा पाटील यांचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी 26 मे रोजी विजय नाट्य मंडळ किडगाव यांच्या वतीने तीन अंकी तमाशाप्रधान विनोदी नाटक बाईच्या तिढ्यात सरपंच कोड्यात अर्थात नाती विसरली रक्ताची या नाटकाचे सादरीकरण होणार असून परिसरातील भाविक भक्तांनी सदरच्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे अहवाल यात्रा कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला