राजमान्य अॅग्रो कडून ३० शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप.
निहाल मणेर.
- Sun 9th Jul 2023 11:40 am
- बातमी शेयर करा

औंध : औंध ता.खटाव येथील राजमान्य अॅग्रो प्रोसेसिंग प्रोडूसर कंपनी यांच्याकडून मा . बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प च्या माध्यमातून तीस शेतकऱ्यांना सोयाबीन मूल्य साखळी विस्तार अंतर्गत मोफत बियाणे व औषधांचे किट याचे वाटप करण्यात आले. राजमान्य अॅग्रो प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड औंध, यांचेकडून दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत ३० शेतकऱ्यांची कंपनीमार्फत निवड करण्यात येते व त्यांना शेतीशाळा, प्रकल्प व औषधे तसेच बियाणे यांचे वाटप करण्यात येते यंदा सोयाबीन के. डी. एस. ७२६ फुले संगम या नवीन वाणाचे वाटप करण्यात आले.
या वितरण प्रसंगी मंडल कृषी अधिकारी श्री.अक्षय सावंत व कृषी पर्यवेक्षक श्री.खंडू शिंदे उपस्थित होते. तसेच श्री.सावंत यांनी सोयाबीन पिकाचे महत्त्व व उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी तसेच कीड नियंत्रणाची संपूर्ण माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री.शिंदे यांनी शेती शाळेचे एकूण सहा वर्गाचे नियोजन केल्याचे सांगितले. त्यातील पहिल्या दोन वर्गात माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. या प्रसंगी शिवाजी चव्हाण, सुजाता गायकवाड, सुनीता दाभाडे, राजमान्य पी.एफ.ओ. अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच गीतांजली यादव, अनिता दाभाडे, मीरा गुरव, शशिकला देशमुख, नजीर खलिफा, भारती देशमुख, रूपाली घाडगे, संतोष कुंभार, हणमंत गायकवाड, जस्मिन मणेर व राजमान्य अॅग्रो चे संस्थापक माजी कृषी अधिकारी श्री.दिलीप दाभाडे उपस्थित होते. या झालेल्या उपक्रमांमधून शेतकऱ्यांना भरघोस फायदा होईल अशी आशा यावेळी श्री. दिलीप दाभाडे यांनी व्यक्त केली.
बियाणे वाटप करताना श्री.दिलीप दाभाडे व लाभार्थी शेतकरी.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sun 9th Jul 2023 11:40 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sun 9th Jul 2023 11:40 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sun 9th Jul 2023 11:40 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sun 9th Jul 2023 11:40 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 9th Jul 2023 11:40 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 9th Jul 2023 11:40 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sun 9th Jul 2023 11:40 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sun 9th Jul 2023 11:40 am