श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा आज भव्य दिव्य रथोत्सव

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

सातारा ... जानेवारी.. येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात मंदिर परिसरातील दक्षिणात्य पद्धतीच्या गणेश मूर्तीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
दरम्यान दरवर्षी साजरा होणाऱ्या या महोत्सवांतर्गत गणेशाचा होम चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी व्यासपीठावर आयोजित केलेल्या पूजा स्थळी अनेक   ब्रह्मवृंदच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच यानिमित्त मंदिर प्रमाणात शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान आज गुरुवार दिनांक 5 जानेवारीला या महोत्सवातील मुख्य रथयात्रेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रथोत्सवासाठी मंदिराच्या अतिशय कोरीव आणि सुबक अशा लाकडी रथाचे सजावट तसेच सुशोभीकरण पूर्ण झाले असून कर्नाटक येथील कुमठा गावातून आपल्या कला सिद्ध हातांनी घडविलेल्या या कोरीव लाकडी रथाचे दरवर्षी संपूर्ण साताऱ्यातून मिरवणुकी द्वारे प्रस्थान होते हा सुशोभित रथ पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविक मार्गावर गर्दी करत असतात .तसेच मंदिरातील या उत्सव मूर्ती या रथात ठेवून त्यांची वाजत गाजत काढण्याची परंपरा गेली अनेक वर्षे नटराज मंदिराने जपलेली आहे.
गुरुवारी 5 जानेवारी रोजी या रथोत्सव सोहळ्याचा प्रमुख दिवस असून पहाटे पाच वाजता श्री गणपती होम होऊन मूर्तीचे यात्रा दान म्हणजेच उत्सव मूर्तींच्या यात्रांचा प्रारंभ होणार आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता या वार्षिक रथोत्सव कार्यक्रमातील मुख्य रथ पूजन व रथप्रस्थानाचा शुभारंभ पाच जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे यासाठी सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच सातारा विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री व सौ .सी.एम .ढबाले आणि सातारा येथील सुप्रसिद्ध लेखापरीक्षक अरुण एम .देवळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी देवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . रथ प्रस्थान होऊन रथयात्रा श्री नटराज मंदिर येथून सकाळी निघाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्या मार्गे श्री साईबाबा मंदिर गोडोली तेथून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरातून पवई नाका येथे येईल. त्यानंतर नगरपालिका चौक, आनंदवाडी दत्त मंदिर मार्गे राज्यपथावरून  देवी चौक आणि राजवाडा येथे पोहोचेल. त्यानंतर मोती चौक द्वारे, शेटे चौक ,पोलीस हेडक्वार्टर द्वारे पवई नाका येथे रथोत्सव आल्यावर श्री कुबेर गणपती मंदिर मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक निवास, सर्किट हाऊस मार्गे हा रथ मिरवणुकीने नटराज मंदिरात सायंकाळी परत येईल. सायंकाळी सहा वाजता मान्यवर भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती होणार आहे .
शुक्रवारी 6 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री गणपती होम होऊन श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने श्री नटराज आला महाभिषेक तसेच लघुरुद्र होऊन नटराज शिवकामसुंदरी देवीचा कल्याण उत्सव अर्थात लग्न सोहळा होऊन त्यानंतर महामंगल आरती आणि महाप्रसाद वितरण केला जाणार आहे .
हा रथोत्सवाचा सर्व खर्च मंदिर तसेच जनता जनार्दनांच्या देणग्यांमधून केला जातो सर्व सातारा जिल्हावाशीयांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने तन ,मन ,धनाने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर साताराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग व रथोत्सव सेवा समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला