वसतिगृहातील खिडकीला दोरी बांधून 11 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

खंडाळा :  खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्यांने वसतिगृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. देवराज प्रशांत धोतरे (वय १६, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाजूलाच मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात रूम नंबर एकमध्ये देवराज धोतरे राहात होता. खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


याबाबत विशाल विजय जाधव (रा. शास्त्री चौक लोणंद, ता. खंडाळा) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार श्री. भिसे हे अधिक तपास करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला