करंजेत 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या
प्रकाश शिंदे
- Thu 21st Jul 2022 07:26 am
- बातमी शेयर करा

दरम्यान येथे नगरपालिकेचे कर्मचारी असून खोळंबा आहे करंज्यात ब-याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसत आहे.औषध फवारणी होत नाही त्या मुळे नगरपालिका आस्तीत्वात आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे
सातारा : येथील करंजे परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या पथकाने या परिसरातील 130 घरांना भेट देऊन डेंग्यू अळ्यांचा शोध घेतला. यावेळी 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. सदर बझार परिसरात 100 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथ रोगांमध्ये वाढ झाली आहे. करंजे, सदरबझार, लक्ष्मी टेकडी या भागांतील अनेक नागरिक ताप, थंडी, सर्दी, अंगदुखी, सांधेदुखी अशा आजारांनी त्रस्त झाले आहेत. करंजे येथील दोन नागरिकांना डेंग्यू झाल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
जिल्हा हिवताप विभागाचे आरोग्य सेवक संपत जंगम यांच्या पथकाने या पेठेत तपासणी मोहीम हाती घेतली. एकूण 130 घरांमधील पाण्याची पिंप, टाक्या, फ्रीज, भंगार या वस्तूंची पाहणी केली. यावेळी पाण्याची आठ पिंपे तातडीने रिकामी करण्यात आली तर सात पिंपांमध्ये औषध टाकून डेंग्यू अळ्या नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर सदर बझार परिसरातील 100 घरांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यात 4 पिंप तातडीने रिकामे करण्यात आले असून त्यातील 3 पिंपांमध्ये औषध टाकून डेंग्यू अळ्या नष्ट केल्या.
चौघांचे घेतले रक्ताचे नमुने
या परिसरातील बहुतांश नागरिकांना सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडून करंजे येथील चार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अनेकांना डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला यावेळी वैद्यकीय अधिकार्यांकडून देण्यात आला आहे.
degu
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 21st Jul 2022 07:26 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 21st Jul 2022 07:26 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 21st Jul 2022 07:26 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 21st Jul 2022 07:26 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 21st Jul 2022 07:26 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 21st Jul 2022 07:26 am
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Thu 21st Jul 2022 07:26 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Thu 21st Jul 2022 07:26 am