तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
सुधाकर दुंदळे
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
- बातमी शेयर करा
मेढा : तळदेव येथे १०५ गावांमध्ये सलोखा व सामाजिक समरसता टिकून राहावी, तसेच जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी वाई कार्यालय आणि १०५ गाव समाज सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समरसता जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.
या बैठकीस मा. पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर परीक्षेत्र) ज्योती क्षीरसागर मॅडम, उपविभागीय अधिकारी साळुंखे साहेब, महाबळेश्वर पोलीस उपनिरीक्षक सांडभोर साहेब तसेच मेढा पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी सभापती धोंडिबा जंगम व सरपंच रामचंद्र जंगम यांनी केले. बैठकीचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी साळुंखे साहेब यांनी करत सामाजिक सलोख्याचे महत्त्व, कायदा व नागरिकांची भूमिका आणि बैठकीमागील उद्दिष्ट स्पष्ट केले.
यावेळी संजय संकपाळ गुरुजी यांनी १०५ गावांच्या समाज व्यवस्थेची रचना, कार्यपद्धती व सामाजिक बैठकींचे स्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली. समाज व्यवस्था ही कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून सामाजिक समरसतेस बाधा येईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
३२ गाव समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प. धोंडीबा महाराज संकपाळ यांनी पारंपरिक १२ बलुतेदार पद्धतीचे उदाहरण देत गावागावातील एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. गणेशजी उतेकर यांनी समाज व्यवस्थेची मजबुती स्पष्ट करत १०५ गावांमध्ये गुन्हेगारी कमी असून समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजातील काही समाजकंटकांवर समाज व्यवस्था प्रभावीपणे नियंत्रण ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत भाऊसाहेब मोरे, बबन सकपाळ, हरिभाऊ सकपाळ आदींनी समाजातील विविध प्रश्न मांडले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योती क्षीरसागर मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करत येथील समाज व्यवस्थेचे कौतुक केले. समाजाने राबविलेले उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. तसेच वाद-विवाद गावपातळीवर किंवा समाजातच मिटवण्याचे आवाहन करत “सत्य ही तिसरी बाजू असते” या विचारातून संवादाने प्रश्न सोडवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस १०५ गाव समाजातील समाजबांधव, पोलीस पाटील, तरुण वर्ग तसेच तळदेव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सरपंच रामचंद्र जंगम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. तळदेव ग्रामस्थांनी भोजन व बैठकीची उत्कृष्ट व्यवस्था करून कार्यक्रम यशस्वी केला.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 17th Mar 2026 06:32 pm













