गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट
Satara News Team
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
- बातमी शेयर करा
कराड : बॅटरी चार्ज केल्यानंतर युवकाने ई-बाईक सुरू केली. मात्र, बाईक सुरू करताच बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना कराड तालुक्यातील साजूर येथे रविवारी दुपारी घडली. या दुर्घटनेतून युवक सुखरूप बचावला. मात्र, स्फोटानंतर लागलेल्या आगीत दुचाकीची सीट आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साजूर येथील गणेश बजरंग चव्हाण या युवकाची इलेक्ट्रिक दुचाकी आहे. रविवारी दुचाकीचे चार्जिंग संपले होते. त्यामुळे गणेश याने घरातच दुचाकी चार्जिंगला लावली. दुपारच्या सुमारास चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर गणेशने दुचाकी बाहेर काढली. त्यानंतर गावात जाण्यासाठी तो दुचाकीवर बसला. त्याने दुचाकीच्या स्टार्टरचे बटन दाबताच बॅटरीच्या डिकीतून धूर येऊ लागला. त्यामुळे गणेश दुचाकीवरुन उतरून बाजूला गेला. त्याचवेळी मोठा आवाज होऊन बॅटरीचा स्फोट झाला.
या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यांनी मिळेल त्या भांड्याने पाणी आणून दुचाकीला लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीच्या सीटखालून सुरू झालेली आग काही क्षणातच पसरली. या आगीत दुचाकीच्या सीटसह इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी गर्दी केली होती.
दरम्यान, दुचाकी सुरू केल्यानंतर गणेश काही कामानिमित्त गावात जाणार होता. मात्र, दुचाकी सुरू करताच ही दुर्घटना घडली. तो दुचाकी सुरू करुन पुढे निघून गेला असता आणि त्यानंतर बॅटरीचा स्फोट झाला असता तर अनर्थ घडला असता. नशीब बलवत्तर म्हणूनच गणेश या दुर्घटनेतून सुखरूप बचावला.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 18th Mar 2024 03:17 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 18th Mar 2024 03:17 pm













