वनक्षेत्रपालांच्या गलथानपणाची शिक्षा ग्रामस्थांना

मार्च एन्डच्या कामांनी केली हुंबरणे गावाची वाट बंद
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी ह्यांना ही रस्ता दुरुस्त करणे बाबत सांगण्यात आले होते परंतु ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष केले  गेले आहे

सातारा न्यूज  /हुंबरणे ह्या मोरणा खोऱ्यातील गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये असून ह्या गावाला जाणारा ८०० (आठशे ) मीटर रस्ता वन हद्दीतून जातो. 
मार्च अखेरीला वनक्षेत्रपाल – ढेबेवाडी  ज्ञानेश्वर राक्षे  ह्यांनी घाई गडबडीने ८०० मीटर रस्त्याकडेला गटार काढले व त्याची माती रस्त्यावरच टाकली. 
ग्रामस्थांनी ह्या मातीवर पाउस पडला तर चिखल होईल व त्यामुळे गाडीवाट बंद होईल अशी भीती व्यक्त करून गेली तीन मीने वनक्षेत्रपाल राक्षे  ह्यांच्याकडे रस्त्यावरील माती काढण्यासाठी वारंवार विनंती केली , परंतु रस्त्यावरील माती काढ्यान आली नाही.
????परिणामी पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखल होऊन एकमेव व्हातुकीला साधन असणारी जीप हुंबरणे गावात जाने बंद झाली आहे.

चिखलात रुतून बसलेली जीप बागेर काढण्यासाठी ग्रामस्थांना दोर लावावा लागला.

 वास्तविक कामाच्या अंदाजपत्रकात रस्त्याकडेला गटर काढून त्याची माती दूर टाकण्याची तरतूद होती परंतु वनक्षेत्रपाल राक्षे ह्यांनी नेमलेल्या ठेकेदाराने माती रस्त्यावरच टाकली
गेली तीन महिने ग्रामस्थ वनक्षेत्रपालांना माती काढण्यासाठी सांगत होते परंतु त्याकडे कानाडोळा केला गेला.

हुम्बारणे गावाचा रस्ता बंद झाल्यामुळे पांढरेपाणी व हुंबरणे येथील ग्रामस्थांना दुध घालण्यासाठी डोंगरातून पायपीट करून काहीर येथे यावे लागत आहे.
 हुंबरणे व पांढरे पाणी साठी रोज एक जीप दुध गोळा करण्यासाठी येते.


सध्या गाडी वाट  बंद असल्यामुळे एखादा ग्रामस्थ आजारी माणसाला तर रितसर रितसर ८०० मीटर डोली करून पलीकडे घेऊन जावे लागते ,, गाडी वाट बंद असल्यामुळे लोकांचे हाल सुरु आहेत. ह्यासाठी सर्वस्वी जबाबदार वनाधिकारी राहतील .
पांडुरंग चाळके
ग्रामस्थ हुंबरणे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला