केदारेश्वर महाराज कोरेगाव  दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत ; वर्धनगडला यात्रेचे स्वरूप

सातारा न्यूज-  वर्धनगड येथे केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे मोठ्या उत्साह पूर्वक व भक्तिमय  वातावरणामध्ये येथील युवा तसेच सामाजिक कार्यकर्ते धनाजी वाघ यांच्या हस्ते पूजन करून मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
.   सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील केदारेश्वर महाराज दिंडीचे चालक शिवाजी शिंदे यांचे अधिपत्याखालील ही दिंडी काढण्यात आलीअसून केदारेश्वर महाराज दिंडीचे हे 27 वे वर्ष आहे. या दिंडीमध्ये  कोरेगाव पासून ते वर्धनगड पर्यंत हजारो भाविक सामील झाले होते. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी प्रशासनाने पंढरपूर आषाढी वारीस परवानगी दिल्याने भाविकांमध्ये या वर्षी मोठा उत्साह दिसून येत होता. तर महिलांची उपस्थिती या दिंडीमध्ये लक्षणीय होती. येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी उपसरपंच अर्जुन कुंभार यांचे नेतृत्वाखाली या ठिकाणी वर्धनगड गावामध्ये भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी भेट सोहळा मोठ्या भक्ती भावात संपन्न करण्यात आला. या दिंडीच्या आगमनाने वर्धनगड मध्ये पूर्ण यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. याचवेळी 100 वर्ष पूर्ण करत दिंडी सोहळा सतत चालू ठेवत असलेली दादा महाराज सातारकर ही दिंडी यावेळी वर्धनगड मध्ये विठ्ठल सावंत यांचे नेतृत्वाखाली यांचेही उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले वर्धनगड एसटी स्टँड परिसरामध्ये अनेक दिंड्याचे आगमन झाल्याने पूर्णतः रस्ता बंद झालेला होता

 

या ठिकाणी वर्धनगड घाटामध्ये येणाऱ्या दिंडी सोहळ्याचे नयन रम्य दृश्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होते. या दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी तसेच भोजनाच्या व्यवस्थेसाठी दिंडीचे पूजन व भेटसोहळा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार यांनी अभूतपूर्व नियोजन केले होते. त्यांचे समवेत धनाजी वाघ, हिंदुराव खवळे, अमोल मोरे, सुरेश कुंभार, ज्ञानदेव फडतरे, दादा घोरपडे, जाफरभाई शिकलगार, राजेंद्र शिर्के, विठ्ठल रोकडे, संतोष कुंभार, परशुराम मोहिते, सूर्यकांत सावंत, शामराव फडतरे, संभाजी घोरपडे बापू स्वामी आदींचे सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला