नवीन प्रशासन भवन शेजारी गुलमोहराचे झाड मुळासकट पडले
अजित जगताप- Mon 15th Jul 2024 11:32 am
- बातमी शेयर करा
सातारा : सध्या सर्वत्र वृक्षारोपण करून सामाजिक भान राखले जात आहे. अशावेळी सातारा बस स्थानक शेजारील सामान्य प्रशासन भवन प्रवेशद्वारा नजीकचे गुलमोहराचे झाड उलमडून पडले आहे. सदर कार्यालय कामकाजाच्या वेळेला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे झाड लावून या ठिकाणी वृक्षारोपण केले होते. एका गुलमोहराच्या झाडाने चक्क भवन शेजारीच मान टाकलेली आहे. प्रवेशद्वाराजवळच पडल्यामुळे अद्यापही ते बाजूला करण्याचे काम सुरू झालेले नाही.
शासकीय अनेक कार्यालय म्हणजे गुप्तवार्ता विभाग, रोजगार व कौशल्य विकास, जिल्हा माहिती कार्यालय, वाहतूक विभाग, कौटुंबिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपनिबंधक कार्यालय, कृषी कार्यालय, आत्मा, अशी महत्त्वाची कार्यालय या इमारतीत असल्यामुळे नियमित नागरिकांची वर्दळ होते. आवारातील हे गुलमोहराचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे वास्तविक पाहता या ठिकाणी अनेक कर्मचारी आपली वाहने उभी करतात. त्या बाजूला ते न पडता इमारतीच्या बाजूला पडल्यामुळे कुठलेही नुकसान झाले नाही. या ठिकाणी रॅम असून दिव्यांग कर्मचारी आपले वाहन लावतात. सदरचे झाड बाजूला करून सातारा नगरपालिकेन त्वरित तत्परता दाखवावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी व वृक्ष प्रेमींनी केली आहे...... .....

नवीन सामान्य प्रशासन भवन शेजारी उलमडून पडलेले झाड (छाया- निनाद जगताप सातारा)
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 15th Jul 2024 11:32 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 15th Jul 2024 11:32 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 15th Jul 2024 11:32 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 15th Jul 2024 11:32 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 15th Jul 2024 11:32 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 15th Jul 2024 11:32 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 15th Jul 2024 11:32 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Mon 15th Jul 2024 11:32 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 15th Jul 2024 11:32 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 15th Jul 2024 11:32 am













