कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
Satara News Team
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
- बातमी शेयर करा
फलटण : पृथ्वी चौक (पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक) ते दहिवडी रोडदरम्यान कोळकी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर (भैय्या) व भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केली.
या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. त्यानुसार अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांनी संबंधित कंपनीचे अधिकारी त्यागी यांची भेट घेऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान बुवासाहेब नगर येथील ओढ्यात पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी मांडली. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाचे डिझाईन अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे की, कितीही पाऊस झाला तरी ओढ्यातील पाणी व्यवस्थित वाहून जाईल. पुलाच्या दोन्ही बाजूंना वॉल बांधून पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरटीओ कार्यालयासमोर असलेला पूल तसेच बुवासाहेब मंदिराजवळील पूल या दोन्ही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात कितीही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या आरटीओ कार्यालयासमोर वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलाजवळ मोठा खड्डा पडला असून तो तातडीने बुजवण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच मुख्य पुलावरून वाहतूक लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या पाहणीवेळी संदीप नेवसे, रणजित जाधव, राजेंद्र खिलारे, किरण जाधव, किरण पखाले, गोरख जाधव, बाळासाहेब रिटे, रणजीत काशीद, वैभव गंगतिरे, सौरभ जाधव यांसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पुलाचे व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल, असा शब्द कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 7th Mar 2026 05:44 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 7th Mar 2026 05:44 pm













