सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांना एक लाखाची लाच घेताना अटक
कोमल पवार
- Thu 6th Jun 2024 08:44 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करुन १ लाखाची लाच स्विकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय ४०) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान याच प्रकरणात येथील समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहाय्यक संचालक सपना घोळवे हिने दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने बुधवारी समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवेंनी तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेवून येण्यास सांगितले. तर समाज कल्याण निरिक्षक दिपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम घोळवे हिने स्विकारताना तीला रंगेहात पकडण्यात आले. तर लाचेची मागणी करणाऱ्या निरिक्षक दिपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपतचे उपाधीक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतिम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांचा कारवाई सहभाग होता.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 6th Jun 2024 08:44 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 6th Jun 2024 08:44 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 6th Jun 2024 08:44 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 6th Jun 2024 08:44 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 6th Jun 2024 08:44 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 6th Jun 2024 08:44 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 6th Jun 2024 08:44 am












