कासवरील वाढत्या कचऱ्यामुळे फुलांचे अस्तित्व धोक्यात : दत्त जगताप

सातारा : सातारा जिल्ह्यातील कास पठार हे ठिकाण वर्ल्ड हेरिटेज मान्यताप्राप्त ठिकाण आहे. या कास पठारावरील निसर्गरम्य वातावरण आणि येथे बहरलेली विविध जातींची फुले हे या कास पठाराचे वैशिष्ट्य आहे. कास पठाराच्या संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक संस्था आणि वनविभाग कायम प्रयत्नशील असते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत निसर्गप्रेमी देश-विदेशातून याठिकाणी भेट देत असतात. कास व्यवस्थापन समिती येथील देखरेखीचे काम करत असते. याठिकाणी अनेक दुर्मिळ फुले आणि वनस्पती आहेत.काही फुले तर देशात फक्त याच ठिकाणी आढळतात.यासाठी या ठिकाणचे संवर्धन होणे गरजेचे आहे. वाढत्या पर्यटनामुळे येथील कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळतो. प्लास्टिक हे निसर्गास घटक असून या कचऱ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. अन्यथा कास पठारावरील फुले कालांतराने नाहीसे होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय दुर्मिळ असणारे कंदीलपुष्प याठिकाणी आहेत. याठिकाणी कचऱ्याचे प्रमाण वाढत असून वारंवार समिती याकडे दुर्लक्ष करत आहे. सातारामधील अनेक निसर्गप्रेमी देखील यासाठी मदत करत आहेत. तरीदेखील वनसमिती याकडे दुर्लक्ष करत आहे. या काळात समिती आजुबाजुच्या गावातील लोकांना कामावर ठेवत असते. याकाळात पठारावर १०० हुन अधिक लोक कामास असतात. तरी देखील येथील दुर्मिळ फुलांचे संगोपन योग्य प्रकारे होत नाही, असे दिसून येते. याकडे सातारा वनविभागाने स्वतःहून लक्ष देणे गरजेचे आहे. तरच कास पठारावरील फुलांचे अस्तित्व कायम राहील, असे मत निसर्गप्रेमी दत्त जगताप यांनी व्यक्त केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला