डंपरची दुचाकीस धडक एक ठार दोन जखमी
Satara News Team
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
- बातमी शेयर करा
वाई :वाई पाचगणी रस्त्यावर गांधी पेट्रोल पंपा जवळ डंपरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक जागीच ठार झाले .तर त्यांची दोन नातवंडे गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. शामराव सहदेव कांबळे (वय ७२ रा विश्वकोश कॉलनी वाई) हे त्यांच्या स्कुटी क्रमांक (एम एच ११बीपी ४६७९) या दुचाकीवरून सुमेध व सिद्धांत या नातवंडांना शाळेतून घरी घेऊन येत असताना रस्ता ओलांडून विश्वकोश कॉलनीतील घराकडे जात होते.यावेळी पाचगणीहुन भरधाव वेगाने आलेल्या डंपर क्र ( एम एच ११ सी एच ५४८४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये यामध्ये शामराव कांबळे यांचा जागी मृत्यू झाला. तर त्यांची दोन्ही नातवंडे गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर अजनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपर चालक दशरथ दत्तात्रय पवार ( राहणार गोडोली पाचगणी ता महाबळेश्वर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 17th Sep 2022 01:22 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 17th Sep 2022 01:22 pm













