आजपर्यंत सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी पालिकेला लुटले... आ. शिवेंद्रराजे आक्रमक

सातारा  :  सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारणी केली असून, ही वाढीव घरपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेत धडक मारली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे, असे ठणकावत याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर, येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज हद्दवाढ भागातील नागरिकांसह सातारा पालिकेत  जाऊन मुख्याधिकारी अभिजित बापट यांना जाब विचारला. यासंदर्भात सातारा पालिकेने चुकीच्या पद्धतीने घरपट्टीची आकारणी केली आहे. यावरुन शिवेंद्रराजे आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात चुकीच्या पद्धतीने घरपट्टी आकारणी झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने त्या त्या भागात कॅम्प लावावेत. तसेच नागरिकांचे प्रबोधन करावे व त्यानंतर जागेवरच घरपट्टी भरुन घ्यावी, अशी सूचना केली होती.

मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. घरपट्टीसारखा महत्वाचा विषय असताना सातारा विकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी याचे उत्तर द्यावे.

आजपर्यंत या आघाडीच्या नेत्यांनी पालिकेला लुटले, त्यांनी उत्तर द्यावे. आलेली घरपट्टी रद्द करावी व योग्य पध्दतीने आकारणी करावी. या संदर्भात निर्णय झाला नाही तर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चुकीची बिले काढणाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला