कोरेगाव मतदार संघात विविध विकास कामे प्रगतीपथावर पक्क्या रस्त्यांचे जाळे विणले- आ महेश शिंदे

बुध निढळ पेडगाव वडूज रस्त्याचे भूमिपूजन

पुसेगाव : कोरेगाव खटाव मतदार संघात पक्या रस्त्याचे जाळे विणले गेले आहे .मतदार संघात अनेक विकासकामे सुरू आहेत .जिहे कटापूर योजनेचे पाणी नेर तलावातून प्रत्येक गावात पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त आपल्या सहकार्यची अपेक्षा आहे .निढळ कातळगेवाडी  या गावाला नेर तलाव्यातुन  पाणी मिळणार आहे.काम प्रगती पथावर आहे.असे प्रतिपादन कोरेगाव खटाव मतदार संघाचे आमदार ना. महेश शिंदे यांनी  निढळ येथे केले .बुध निढळ पेडगाव रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते निढळ येथे झाले.निढळ अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले .या कामासाठी  5 कोटी निधी मंजूर करण्यात. आला .आहे.यामुळे येथील जनतेला या रस्त्याचा फायदा होणार आहे .रस्ते चांगले असले की त्या भागांचा विकास होतो. त्यामुळे आमचे लक्ष जनतेला चांगले पक्के रस्ते देण्याचे आहे .आमच्या विकासकामात जनतेचे सहकार्य आम्हाला मिळत असल्याचे सांगितले.यावेळी जी डी फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन खुस्पे ,निढळ कातळगेवाडीचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य, ग्रामस्थ ,उपस्थिती होते .नंदकुमार,देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ताया खुस्पे यांनी आभार मानले यावेळी नवनाथ वलेकर, साहेबराव पाटील ,भीमराव पाटिल ,नवनाथ खुस्पे अशोक घाडगे  संजय भोंडवे ,अरुण जाधव, सुनील शिंदे, विजय शिंदे,दिलीप जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला