साताऱ्यात हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचे 'घरगुती कनेक्शन'

सातारा : सातारा शहर आणि उपनगर परिसरात कॅफे आणि लॉजवर अवैध धंदे सुरु असून याबाबत सातारा न्यूजने अनेकदा आवाज उठविला होता. यावर पोलीस प्रशासनाने दखल घेत कारवाई देखील केली आहे. परंतु साताऱ्यात अद्यापही काही ठिकाणी असे अनैतिक प्रकार सुरु असून पोलिसांकडून कारवाईत सातत्य राखण्याचे एक आव्हान उभे आहे. कॅफे आणि लॉजवर असे अवैध धंदे सुरु असतानाच साताऱ्यात अनेक ठिकाणी घरांमध्येच वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरहुन तरुणी व महिला आणून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. साताऱ्यातील उच्चभ्रू वसाहतीत असे अवैध धंदे चक्क घरांमध्ये सुरु असून याकडे केवळ हप्तेगिरीने पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.  
  दोनच दिवसांपूर्वी एका सावत्र आईनेच मुलीला केवळ साडेतीन हजारांसाठी जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पडल्याची घटना ताजी असून यातील नराधम आरोपींना अद्याप अटक झाली नाही. ही घटना ज्या लॉजवर घडली तिथे देखील अनेक अवैध धंदे सुरु असल्याचे काही सामाजिक संघटनांनी बोलून दाखविले आहे. सातारा न्यूज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यातील एका कॅफेत चालू असलेले अश्लील चाळे समोर आणल्यानंतर अखेर त्या कॅफेत केवळ हप्ते घेण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना तिथे कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास क्रमप्राप्त झाले. मात्र संबधित कॅफेमालक, चालक आणि कॅफेत रासलीला करण्यासाठी आलेल्या तरुणांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर शेंद्रे-सोनगाव रस्त्यावरील किनारा हॉटेलमध्ये ही तालुका पोलिसांनी कारवाई करत तिघा संबंधितांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच किनारा हॉटेलमध्ये हॉटेलच्या नावाखाली पाठीमागील रूममध्ये महिला आणून वेश्या व्यवसाय चालवला जात होता व अजूनही चालवला जातो. 
सातारा शहर आणि उपनगरांची विभागणी हि सातारा शहर, शाहूपुरी आणि तालुका पोलीस स्टेशन अशा तीन पोलीस ठाण्यात झाली असून या हद्दीत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांनी आपले बस्तान चक्क उच्चभ्रू वस्तींमध्ये बसवले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरहुन तरुणी व महिला आणून त्यांना देहविक्रीसाठी हॉटेल, लॉज, कॅफे आणि बंगल्यांमध्ये पुरविण्यात येत आहे. साताऱ्यात चाललेल्या या वेश्याव्यवसायाचा ठावठिकाणा पोलिसांनादेखील माहिती असून लक्ष्मी कृपा होत असल्याने संबंधित ठिकाणी पेट्रोलिंग केले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तर संबंधित व्यवसाय चालवणाऱ्यांना आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी हटकले असता त्यांच्यावरच अरेरावीची भाषा करून आमचे पोलिसांशी चांगले संबंध असून तुम्हाला अडकवण्याची भाषा हे महाभाग करत आहेत. पोलिसांशीच चांगले संबंध असल्याची बतावणी केल्यामुळे सामान्यांचीही कोंडी होत आहे. हे व्यावसायिक देखील चांगलेच तरबेज असून त्यांनी कुंटणखान्याची व्याख्या बदलली असल्याचे समोर येत आहे. बाहेरून मुली आणून ग्राहकांना मोबाईलवर फोटो पाठवून डील फायनल झाल्यास त्यांना संबंधित महिला / तरुणीसोबत लॉज पाठवून द्यायचे, असा सगळा हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी सुरु आहे. हा व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये काही महिला आघाडीवर असून तरुणी आणि महिलांना देह व्यापार करण्यास भाग पडून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत. तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी त्यांचे एजंट देखील मार्केटमध्ये सक्रिय आहेत.    
 पोलीस अधीक्षक समीर शेख साताऱ्यात रुजू झाल्यापासून अवैध धंदेवाल्यांचा बिमोड करण्याच्या सुचना पोलीस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना दिल्या आहेत. यापूढे काही समाधानकारक कारवाया होत असताना दिसून देखील येत आहेत. मात्र, हे महिला आणि तरुणींना देहव्यापार करायला लावून स्वतःचा आर्थिक फायदा करणाऱ्या नराधमांना ठेचण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. 


 साताऱ्यात बाहेरून तरुणी आणून त्यांना हॉटेल, लॉज किंवा उच्चभ्रू वसाहतीतील रूममध्ये ठेऊन त्यांचे फोटो एजंट लोकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत असून डील फायनल झाल्यास ग्राहकाला संबंधित लॉज किंवा रुमवर पाठवून वेश्याव्यवसाय केला जातो. साताऱ्यात असा व्यवसाय करणारे जाळे सक्रिय असून दर दोन दिवसाला बाहेरील जिल्ह्यातून वेगवेगळ्या तरुणी आणून त्यांच्यामार्फत हा वेश्याव्यवसाय चालवला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला