जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायळीच्या विद्यार्थ्यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास भेट

सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायळी यांचे वतीने सातारा तालुका विज्ञान प्रदर्शनास शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या ठिकाणी भेट देण्यात आली. या भेटीनंतर सर्वच मुलांनी छत्रपती शिवाजी संग्रहालयास भेट दिली. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगड पराक्रमाची आठवण म्हणून शिवाजी छत्रपती शिवाजी संग्रहालयात असलेली वाघ नखे दाखवण्यात आली सर्व मुलांनी शस्त्रास्त्र व साहित्याची पाहणी केली. 


 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्र आणि नाण्यांचा खजिना पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करत मुले परत फिरली यानंतर मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण जगताप यांच्या संकल्पनेतून सर्वच विद्यार्थ्यांना सातारा पंचायत समितीत भेट देण्यास घेऊन गेले. तालुका प्रशासन कसे चालते याची मुलांना कल्पना यावी यासाठी पंचायत समितीची भेट मुलांना खूप महत्त्वाचे ठरणार आहे



 यामध्ये पंचायत समितीच्या विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या सुरुवातीलाच प्रशासनाच्या आस्थापना शाखेत भेट दिली त्या ठिकाणी अधीक्षक श्री. कमलाकर वाघ यांनी मुलांना प्रशासनाच्या विविध विविध कामकाजाविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर सर्वच मुलांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग घरकुल विभाग पाणीपुरवठा विभाग या विभागांना भेटी दिल्या आणि तेथील कामकाज कसे चालते याविषयीची माहिती मिळवली. मुलांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सुंदर उत्तर दिली मुलांना विविध प्रश्न विचारले मुलांनीही त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरे देऊन विचारांची देवाण-घेवाण केली.

 शैक्षणिक सहलीचा मुलांचा आजचा दिवस खूपच सुंदर गेला असे सर्वच मुलांनी आपल्या पालकांना सांगितले. शैक्षणिक सहल आणि पंचायत समिती शिवाजी छत्रपती शिवाजी संग्रहालय भेट हा उपक्रम खूप सुंदर झाला असे साळली गावच्या सरपंच सौ पुष्पा कोकरे उपसरपंच श्रीयुत विकास देवरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत देवरे तसेच सर्वच ग्रामस्थांनी या उपक्रमाला दाद दिली. सहलीचे नियोजन मुख्याध्यापक श्री बाळकृष्ण जगताप त्याचप्रमाणे उपशिक्षिका सौ माधवी ढाणे यांनी केले होते

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला