शांतता कमिटीच्या बैठकीमध्येच वादावादी. पोलिसांनी काढले अमोल तांगडे व नरेंद्र पाटील यांना बैठकीतून बाहेर
Satara News Team
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सुरु असतानाच हिंदूत्ववादी संघटनांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे आला. यावर बैठकीतच तणावाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत अमोल तांगडे व नरेंद्र पाटील यांना बैठकीतून बाहेर नेल्याने हा तणाव निवळला. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. येथील पोलीस करमणूक केंद्रातील अलंकार सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लीम व प्रशासकीय अधिकारी यांची शांतता समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव उपस्थित होते. बैठकीत सामाजिक, राजकीय कार्यकर्तेही सहभागी होते. यावेळी स्वातंत्र्य दिनी इन्स्टाग्रामवर समाजविघातक पोस्ट केल्याच्या विरोधात हिंदूत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता, त्या मुद्दयावर नरेंद्र पाटील यांनी ३५ वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन आत गेले नव्हते. पण, त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त त्यावेळी नव्हता. पोलीस बंदोबस्त पालकमंत्र्यांच्या घरासमोर लावला जातो, असे सांगितल्याने अमोल तांगडे संतप्त झाले. गणेशोत्सव, ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे, इतर विषय काढून बैठक भरकटवू नये, असे सुनावले. यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला. यावेळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तांगडे यांना बैठकीतून बाहेर नेले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनाही बैठकीतून बाहेर नेले. तेथे दोघांना समजवल्यानंतर पुन्हा बैठकीत बसण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर बैठक सुरळीत सुरु झाली.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 1st Sep 2023 10:17 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 1st Sep 2023 10:17 pm













