“एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो… मै खुद की भी नहीं सुनता”; मुख्यमंत्री शिंदेंचा पाटणमधून विरोधकांवर निशाणा
Satara News Team
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
- बातमी शेयर करा

पाटण : आज पाटण तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर लाडक्या बहीण योजनेवरून निशाणा साधला. “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना या १५०० रुपयांची किंमत काय कळणार? माझ्या लाडक्या बहिणींना ती कळलीय. आमचं महायुतीचे सरकार हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. या सरकारची ताकद जर तुम्ही वाढवली कि १५०० हजारचे पुढे २ हजार होतील, २ हजारचे ३ हजार होती. विरोधक म्हणतायत ही योजना बंद पडेल खूप दिवस चालणार नाही. मात्र, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही. कुणीही मायकलाल हि योजना बंद पाडू शकणार नाही. आम्ही हि योजना मतांसाठी सुरु केली नसून लाडक्या बहिणींची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केली आहे. लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन होय. सर्वांना एकाच सांगतो हे सरकार तुमचं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरची घटना झाली तेव्हा त्या नराधाला फाशी द्या असे विरोधक म्हणाले. मात्र, जेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला पोलिसांनी गोळी मारली. तेव्हा विरोधक म्हणाले कि कशाला गोळी मारली?. अशी दुट्टपी भूमिका मांडणारे हे विरोधक आहेत. प्रत्येक विकासकामांच्या विरोधात विरोधी भूमिका मांडणारे हे विरोधक आहेत. अशा विरोधकांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्या मतपेटीतून एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाहीत, असा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
पाटण येथील कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 29th Sep 2024 07:32 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sun 29th Sep 2024 07:32 pm