बेडकानं बैल व्हायचं पाहु नये... मी बैल आहे, माझी काॅपी कोणी करु नये...अभिजीत बिचुकले

सातारा : मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सिलेंडरच्या किमती 50 टक्के कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत माध्यमांशी ते बोलत होते. पुढे म्हणाले, मी बैल आहे, माझी काॅपी कोणी करु नये बेडकानं बैल व्हायचं पाहु नये असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी विरोधकांना लागावला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिली. त्याबाबत सरकारचं अभिनंदन करतो, मात्र महिला वर्गाची खरी गरज असणा-या सिलेंडरला 1200 रुपये द्यावे लागतात. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरकारने ताबडतोप सिलेंडरवर 50 टक्के सबसिडी द्यावी, अशी सुचना पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलंय.तर पुढील मुख्यमंत्री ही महिला असेल ही भुमिका मी मांडली होती. मात्र, आता माझी काॅपी इतर लोकं करायला लागले आहेत. मी बैल आहे, माझी काॅपी कोणी करु नये. बेडकानं बैल व्हायचं पाहु नये, असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी लागावलाय.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला