शानभाग विद्यालयाच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
Satara News Team
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
- बातमी शेयर करा

सातारा- येथील श्याम सुंदरी रिलीजियस अँड चॅरिटेबल सोसायटीच्या के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये विद्यालयाचा इयत्ता दहावी मध्ये शिकणारा युवराज प्रवीण चव्हाण हा सेकंड रँक ने निवडला गेला तसेच इयत्ता नववी ब मध्ये शिकणारा शारीर राजेंद्र माने याची तिसऱ्या रँक साठी निवड झाली आणि इयत्ता आठवी अ मध्ये शिकणाऱ्या कु सिद्धी शिवाजी पाटील या मुलीची चौथ्या रँक साठी निवड करण्यात आली आहे या खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक धनश्री जाधव यांचे प्रशिक्षण लाभले या निवडीबद्दल तसेच या तिघांनी केलेल्या अतिशय नेत्रदीपक कामगिरीबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग ,संस्थेच्या संचालिका सौ.आंचल घोरपडे, विद्यालयाच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि प्राचार्य सौ .रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे अध्यक्ष ,प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षिका व पालकांनी या यशाबद्दल कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Thu 2nd Feb 2023 04:08 pm