शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला आयपीएलचा लाईव्ह सोहळा
Satara News Team
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
- बातमी शेयर करा

सातारा : मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या आयपीएल सामन्यासाठी सातारमधून शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावली हजेरी. मुंबई इंडियन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध वानखेडे मैदानावर सामना खेळला. हा सामना पाहण्यासाठी ई.एस. ए. एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल अंतर्गत 19000 मुले स्टेडियम मध्ये उपस्थित होती. यामध्ये आमच्याही शाळेच्या 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यातून त्यांना स्वतःच्या आदर्श खेळाडूला प्रत्यक्ष खेळताना पाहता आले. तसेच आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देता आले.मुंबई इंडियन संघाकडून ई. एस. ए. दिन उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वत्सला डुबल मॅडम, संस्थेचे दोन्ही उपाध्यक्ष मा. श्री.जगन्नाथ किर्दत सर व मा. श्री.नंदकुमार जगताप सर , संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर व स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, माजी अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार सर ,संचालिका मा. सौ हेमकांची यादव मॅडम तसेच मा. श्री. विनीत पाटील सर व रिलायन्स फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सामना पाहण्याचा व आनंद घेण्याचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खरोखरच पाहण्यासारखा होता. सर्व संस्था प्रमुख व पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

आतापर्यंत जे क्रिकेट टिव्हीच्या माध्यमातूनच पहात होते तो सामना मैदानावर जाऊन लाईव्ह पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणी तोच आनंद आज क्रिकेटचा सामना पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता या उपक्रमाचे कौतुक सर्व विद्यार्थ्यांनी केले असे विविध उपक्रम शाळेने राबवावेत या मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अनखी भर पडेल असे पालकांकडून बोलले जात होते या उपक्रमाचे स्वागत करत पालकांकडून शाळेचे आभार व्यक्त केले
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Mon 28th Apr 2025 08:12 pm
-
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा उत्साहात साजरा
- Mon 28th Apr 2025 08:12 pm