श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
Satara News Team
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
- बातमी शेयर करा

सातारा : शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात अभिनंदनीय कामगिरी केली आहे... शालेय आर्चरी स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात देवेंद्र जगताप,बॉक्सिंग स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात दिव्यांशु डुबल व यश निकम तर १९ वर्ष वयोगटात ज्युदो खेळप्रकारात प्रथमेश कांबळे यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे...
शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झालेले खेळाडू जलतरण खेळ विभागात १७ वर्ष वयोगटातून अनुष्का माळी हिने २०० मीटर बॅकस्ट्रोक व ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तर धावणे खेळप्रकारात १७ वर्ष वयोगटातून सोहम चव्हाण याने ८०० मीटर व ४०० मीटर प्रकारात आणि आर्चरी खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगटातून शिवम चौरासिया या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे...
याशिवाय तालुकास्तर कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा मैदानी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा तर जिल्हास्तर स्पर्धेत आर्चरी, बॉक्सिंग,मल्लखांब व सायकलिंग स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता...
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्धल संस्थेच्या अध्यक्षा वत्सलाताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील स्कूल कमिटी चेअरमन प्रतिभा चव्हाण, संचालक प्रतापराव पवार, चंद्रकांत पाटील,हेमकांची यादव,धनंजय जगताप, रविंद्र जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या....
यशस्वी विद्यार्थ्यांना सुशांत साळुंखे व यशवंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले...
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Wed 16th Oct 2024 03:28 pm
-
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा उत्साहात साजरा
- Wed 16th Oct 2024 03:28 pm