साताऱ्यात 2 ट्रक दिव्यांग व्हील चेअर पॅकपीस भंगारात
विशाल कांबळे
- Thu 21st Jul 2022 11:44 am
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा शहरातील मोळाचा ओढा येथील शहीद संतोष महाडीक पोलीस चौकी शेजारी चक्क 2 ट्रक भरून दिव्यांगांच्या व्हील चेअर भंगारात देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या व्हील चेअर पॅकपीस असल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. दिव्यांगांच्या नव्या कोऱ्या व्हीलचेअर भंगारत काढल्या प्रकरणी स्क्रॅप दुकानदार मालक यांची तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा शहरात दिव्यांगांना वाटप न करता अशाप्रकारे भंगारात पॅकपीस टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या शासकीय विभागातून हे भंगारात टाकले आहेत की अन्य कोणत्या ठिकाणाहून पॅकपीस पाठवले आहेत. या प्रकरणाचा शोध घेणे गरजेचे असून अशाप्रकारे व्हील चेअर पॅकपीस भंगारात कवडीमोल भावाने का विकले गेले हाही प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाराच्या सुमारास ट्रकमधून व्हील चेअर आणल्याने नक्की याबाबत काय गोलमाल आहे, यांचा शोध घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडून केली जात आहे.
साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला असून याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. यामध्ये दोषींवर कारवाई करून या व्हील चेअर जप्त करून त्या गरजू दिव्यांगांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास भंगार व्यावसायिकाने नकार दिला आहे.
गरजू दिव्यांगांना अजून देखील शासनाकडून व्हीलचेअर मिळत नसताना दुसरीकडे दोन ते तीन ट्रक भरून नव्या कोऱ्या व्हील चेअर भंगारत काढल्या जातात. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
wheelchair
satara
divhyang
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 21st Jul 2022 11:44 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 21st Jul 2022 11:44 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 21st Jul 2022 11:44 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 21st Jul 2022 11:44 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 21st Jul 2022 11:44 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 21st Jul 2022 11:44 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Thu 21st Jul 2022 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Thu 21st Jul 2022 11:44 am