तुम्हीही जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती खाता का? थांबा, आताच वाचा ही बातमी
Satara News Team
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
- बातमी शेयर करा

आरोग्य टिप्स: सहसा जेवणाची वेळ झाली, की आपण सर्वजण पोळी-भाजी, वरण भात, किंवा तत्सम पदार्थांना प्राधान्य देतो. शाळकरी मुलांपासून नोकरदार वर्गापर्यंत, सर्वजण डब्यातही पोळीभाजी, किंवा पोळी आणि त्याजोडीला काहीतरी नेतात. पण, ही गव्हाच्या पिठापासून (wheat roti) तयार करण्यात आलेली पोळी खरंच आरोग्यासाठी फायद्याची आहे का? शरीर निरोगी राहण्यासाठी काही घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात. यामध्ये काही फॅटी अॅसिड, व्हिटामिन, मिनरल्स, कार्ब्स आणि प्रोटीनचा (Carbs, Proteins) समावेश असतो.
सध्याचं धकाधकीचं आयुष्य पाहता, त्यामध्ये गव्हाच्या पिठाची चपाती अगदीच फायद्याची नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण, याला पर्याय म्हणून जर ज्वारीच्या पिठाची भाकरी खाणं तुम्हाला शक्य होत असेल तर, हा पर्याय सर्वोत्तम ठरेल. कारण, यामध्ये तंतुमय पदार्थांचं (Fiber) प्रमाण जास्त असतं. दैनंदिन आहारात ज्वारी- बाजरीच्या भाकऱ्यांचा (jowar Bhakri) समावेश केल्यास त्यामुळं हृदयविकार, टाईप 2 डायबिटीड आणि स्थुलता नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. यामुळं शरीरातील Uric Acid चं प्रमाणही नियंत्रणात राहतं. ज्वारीच्या पिठामध्ये बरेच फाईटोकेमिकल एंटीऑक्सीडंट असतात. त्यामुळं शरीराला सूज असल्याच आहारात या भाकरीचा समावेश केल्यास त्याचे थेट परिणाम तुम्हाला दिसू शकतील. शिवाय ज्यांना ( Acicity ) आम्लपित्ताचा त्रास आहे, अशा मंडळींनीही ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास आम्लपित्त नाशासाठी ते फायद्याचं ठरतं. हाडं मजबूत करायचीयेत? (Strong bones) हाडांच्या समस्या असणाऱ्यांनी आहारामध्ये गहूच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपाती किंवा तत्सम पदार्थाऐवजी ज्वारीच्या भाकरीला वापर वाढवावा. यामुळं शरीराला फॉस्फरससोबतच कॅल्शियमही (Calcium) पुरेशा प्रमाणात मिळतं. ग्लुटनमुक्त आहाराच्या सवयी अवलंबू इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा ज्वारीचं पीठ उत्तम पर्याय ठरतं. ज्वारीचं पीठ नव्हे, शरीरासाठी वरदानच म्हणा! ज्वारीच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे किंवा एका ज्वारीच्या भाकरीमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोट फुगणं, अपचन, अतिसार आणि पचनाच्या इतर व्याधींवर गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्यांऐवजी ज्वारीचं पीठ, ज्वारीची भाकरी म्हणजे रामबाण उपाय.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. सातारा न्यूज याची खातरजमा करत नाही. सदरील गोष्टी अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
UricAcid
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Tue 13th Sep 2022 02:39 pm
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Tue 13th Sep 2022 02:39 pm