मिरवणूकीत झालेल्या वादाच्या कारणातून एकावर कोयत्याने वार

सातारा : मिरवणूकीत झालेल्या वादाच्या कारणातून एकाला कोयत्याने वार करुन जखमी केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज उंबरकर, सागर उंबरकर, प्रेम यादव, अनोळखी एकजण यांच्या विरुध्द श्रेयश अनिल पाटील (वय 19, रा. करंजे पेठ, सातारा) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 20 जुलै रोजी घडली आहे. मिरवणूकीत मुलांची भांडणे झाल्यानंतर ती सोडवण्यात आली होती. मात्र त्या गैरसमजातून संशयित युवकांच्या टोळक्याने कोयत्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. यावेळी संशयितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास बघून घेतो, असे म्हणत धमकी दिली. दरम्यान, ही घटना मोळाचा ओढा व कोटेश्वर मैदान येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला