शाळेतील गॅदरिंगमध्येच मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर
सतीश जाधव
- Mon 17th Jun 2024 10:52 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील एका शाळेमध्ये नोव्हेंबर 2023 ला गॅदरिंग पाहण्यासाठी गेलेल्या मुलीवर शाळेतच भोवळ आली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर अत्याचार केला. त्यातून संबंधित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञातावर बोरगाव पोलिस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोअंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावामधील शाळेत नोव्हेंबर २०२३ मध्ये गॅदरिंग होते. हे गॅदरिंग पाहण्यासाठी १५ वर्षांची मुलगी मैत्रिणीसोबत गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध झाली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी संबंधित पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला डाॅक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.
घरातल्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने नोव्हेंबर महिन्यात बेतलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर मुलीच्या आईने शनिवार, दि. १५ रोजी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 17th Jun 2024 10:52 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 17th Jun 2024 10:52 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 17th Jun 2024 10:52 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 17th Jun 2024 10:52 am
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 17th Jun 2024 10:52 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 17th Jun 2024 10:52 am












