तंबाखू दिली नाही म्हणून साताऱ्यात कोयत्याने डोक्यात वार

सातारा : तंबाखू दिली नाही म्हणून एकास लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केला. हा प्रकार सातारा शहराजवळील प्रतापसिंहनगरात घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी रोहित जितेंद्र भोसले (रा. प्रतापसिंहनगर) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मनोज पवार, संतोष लंकेश्वर, दत्ता भोसले आणि साैरभ मंडलिक (पूर्ण ना नाही. सर्व रा. प्रतापसिंहनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी (दि. २४) हा प्रकार घडला. 

तक्रादार यांनी तंबाखू दिली नाही म्हणून त्यांना चिडून संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने कोयत्याने डोक्यात वार केला. त्याचबरोबर भांडणे सोडविण्यास आल्यानंतर तक्रारदाराच्या आईलाही धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार कदम तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला