महामार्गावर दोन एसटी बसना अपघात
रामकृष्णनगर येथे शिवशाही झाली पलटी * नागठाणे येथे लालपरी गेली खड्ड्यातSatara News Team
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
- बातमी शेयर करा
नागठाणे : ग्वाल्हेर -बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर व नागठाणे या दोन ठिकाणी शिवशाही व लालपरी या एसटी बसना झालेल्या अपघातात शिवशाही बसमधील सहा प्रवासी जखमी झाले.सोमवारी दुपारी हे दोन्ही अपघात घडले
याबाबत घटनास्थळ व बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ग्वाल्हेर- बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कारने हुलकावणी दाखवल्याने शिवशाही वरील चालकाचा ताबा सुटला आणि शिवशाही बस महामार्ग नजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये अठरा प्रवासी होते.यापैकी गंगुबाई शिवाजी पुजारी,हेमा अण्णाप्पा जाधव, सरुबाई अन्नप्पा जाधव,अमित अशोक भागवत, मोहन सावंत व आणखी एक जण असे सहा जण जखमी झाले.
याच दरम्यान कराड ते सातारा लेनवर नागठाणे गावच्या हद्दीत कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी चालकाचा चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस महामार्ग नजीकच्या नाल्यात गेली. या बसमध्ये वीस प्रवासी होते.मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.या दोन्ही अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई,श्री. घाडगे, हवलदार प्रकाश वाघ तसेच जनता अंब्युलेन्सचे अब्दुल सुतार,सोहेल सुतार,आजीम सुतार,समीर केंजळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शिवशाही बस अपघातातील जखमींना उपचारासाठी नागठाणे येथे पाठवले.या दोन्ही अपघातांमुळे महामार्गावरील वहातुक काही काळ विस्कळीत झाली होती.


रामकृष्णनगर येथे पलटी झालेली शिवशाही नागठाणे येथे खड्यात गेलेली लालपरी
lalpari
st
Statements
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 8th Aug 2022 03:25 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 8th Aug 2022 03:25 pm













